1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गया , मंगळवार, 26 मे 2015 (13:55 IST)

बिहारमध्ये माओवाद्यांचे थैमान

सुरक्षा दलाच्या कारवाईत माओवाद्यांची एक महिला कमांडर ठार झाल्याचा सूड म्हणून संतप्त माओवाद्यांनी बिहारमधील गया जिल्ह्यात अक्षरश: थैमान घातले. येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनवर गाडय़ा अडवून माओवाद्यांनी तब्बल 32 ट्रक जाळून टाकले. तर सारण जिल्ह्यात मोबाइल टॉवर उडवून दिला. या घटनेनंतर येथील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. गयामध्ये गेल्या आठवडय़ात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली होती. त्यात माओवाद्यांची महिला कमांडर सरिता गंजू ठार झाली होती. सरिता ऊर्फ   ऊङ्र्किला गंजू ही माओवाद्यांच्या छत्तीसगड, बिहार, झारखंड विभागाची स्पेशल एरिया कमिटीची सदस्य होती.