वीज पडल्याने बिहारमध्ये 55 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली- बिहारमध्ये विविध ठिकाणी झालेल्या तुफान वादळ आणि वीज पडल्याने 55 जणांचा मृत्यू झाला तर 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या मुख्य सचिवांनी दिली.
बिहारमधील अनेक जिल्ह्यात मंगळवारी 70 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आणि विजेचे खांब देखील पडले, राज्यातील भागलपूर, पूर्व आणि पश्चिम चंपारण, सीतामढी, गोपालगंज, सिवान, मुजफ्परपूर, वैशाली, मुंगेर आणि पाटणा जिल्ह्यात यामुळे सर्वाधिक नुकसान झाले.
राज्य सरकारने मृतांच्या एका नातेवाईकाला प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात वीज अंगावर पडून चारजणांचा मृत्यू झाल्याचे अधिकार्यांनी सांगितले.