सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2024 (11:42 IST)

कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू

fire
दिल्लीतील अलीपूर मार्केटमधील एका पेंट कारखान्यात काल संध्याकाळी उशिरा भीषण आग लागली. अपघाताच्या वेळी अत्यंत अरुंद परिसरात असलेल्या या पेंट फॅक्टरीत कामगार काम करत असल्याने आग लागल्यानंतर ते बाहेर पडू शकले नाहीत. मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे.

आग इतकी भीषण होती की आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या.कित्येक तास धगधगत राहिली. अग्निशमन दल पोहोचेपर्यंत आग इतकी पसरली होती की, 11 जणांना आपला जीव गमवावा लागला. आग एवढी भीषण होती की जवळच्या घरांमध्ये धुरामुळे  लोक बेशुद्ध झाले होते. 

दिल्लीतील अलीपूर मार्केटमधील एका पेंट कारखान्यात गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली. अपघाताच्या वेळी अत्यंत अरुंद परिसरात असलेल्या या पेंट फॅक्टरीत कामगार काम करत असताना ते आगीतून बाहेर पडू शकले नाही. मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. आग लागल्याचे समजतातच परिसरात गोंधळ उडाला. 

आजूबाजूची दुकाने आणि काही घरेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. मजुरांव्यतिरिक्त काही लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरूच असून सकाळी अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.

अग्निशमन दलाच्या गाड्या येण्याआधीच आग एवढी मोठी होती की अलीपूरच्या बाजारपेठेतूनही उंच ज्वाळा दिसत होत्या. आग लागल्यानंतर धुराचे लोट काही किलोमीटर दूरपर्यंत दिसत होते. आगीच्या घटनेनंतर आजूबाजूच्या घरांमध्ये धुराचे लोट पसरल्याने लोक बेशुद्ध झाले. जवळच्या इमारतीतील तीन जखमींना एलएनजेपी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 

अग्निशमन दलाच्या 22 गाड्यांनी अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला होता .
 
हा कारखाना सोनीपत येथील अखिल जैन चालवत होता. अग्निशमन दलासह एनडीआरएफ घटनास्थळी पोहोचले आणि जळालेल्या इमारतींमध्ये शोधमोहीम राबवली. पेंट कारखान्यातून एकूण 11 जळालेले मृतदेह सासापडले असून त्यात 10 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे. मृतदेह बीजेआरएम रुग्णालयात सुरक्षित ठेवण्यात आला असून मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.याप्रकरणी अलीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 
 
 

Edited by - Priya Dixit