शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (10:31 IST)

इलेक्ट्रिक बाईक चार्ज करताना बाईक शोरूमला आग लागून 8 जणांचा होरपळून मृत्यू

तेलंगणातील सिकंदराबाद येथे सोमवारी रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. येथील इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरूमला आग लागली. येथे इलेक्ट्रिक बाईक चार्ज होत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत. 
 
डीसीपी नॉर्थ झोन चंदना दीप्ती म्हणाल्या, "आधी सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली होती, पण गुदमरल्यामुळे आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितले, 
लॉज देखील शोरूमच्या वर स्थित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीमुळे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर धुराचे लोट पसरले. त्यामुळे लोकांचा श्वास कोंडला गेला. यानंतर लोकांनी इमारतीवरून उडी मारून आपला जीव वाचवला. स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, अनेकांचा त्यात अडकून गुदमरून मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढाकार घेत लोकांना इमारतीबाहेर काढले. या घटनेत सर्व्हिसिंगसाठी आलेल्या पाच नवीन स्कूटर आणि 12 जुन्या स्कूटर जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यात अनेकांचा अडकून गुदमरून मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढाकार घेत लोकांना इमारतीबाहेर काढले. या घटनेत सर्व्हिसिंगसाठी आलेल्या पाच नवीन स्कूटर आणि 12 जुन्या स्कूटर जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यात अनेकांचा अडकून गुदमरून मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुढाकार घेत लोकांना इमारतीबाहेर काढले. या घटनेत सर्व्हिसिंगसाठी आलेल्या पाच नवीन स्कूटर आणि 12 जुन्या स्कूटर जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे.  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, सिकंदराबाद येथे लागलेल्या आगीत आठ जणांचा मृत्यू झाल्याने दु:ख झाले आहे. शोकग्रस्त कुटुंबियांच्या सांत्वना. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. यासोबतच त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली. 
 
ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. अग्निशमन दलाच्या पथकांनी लॉजमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण धुरामुळे काही लोकांचा मृत्यू झाला. लॉजमधून काही जणांची सुटका करण्यात आली. या घटनेमागील कारण जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे.