रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 1 ऑक्टोबर 2024 (12:22 IST)

एका व्यक्तीने दिली कुत्र्याला भयंकर शिक्षा

मध्य प्रदेशमधील गुना येथे एका मुलीला कुत्र्याने चावा घेतल्यावर मुलीच्या वडिलांनी कुत्र्याला आधी मारहाण केली, नंतर दोरीने दुचाकीला बांधून ओढत नेले आणि शेवटी दगडाने ठेचून त्याची हत्या केली. असा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील गुना येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने कुत्र्याला त्याच्या दुचाकीला बांधून ओढलेच नाही तर एका मोठ्या दगडाने कुत्र्याला ठेचून त्याची हत्या केली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्राणीप्रेमींनी क्रुएल्टी टू ॲनिमल्स कायद्यांतर्गत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
तसेच गुना पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मुलीला कुत्रा चावला असल्याचे आढळून आले. आरोपी तरुणाला हा प्रकार कळताच त्याने रागाच्या भरात कुत्र्याला शिक्षा करण्याचा बेत आखला आणि नंतर कुत्र्याला खूप मारहाण करून त्याची हत्या केली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलीस अधिकारींनी सांगितले. 

Edited By- Dhanashri Naik