1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 1 जानेवारी 2022 (23:49 IST)

औरंगाबादच्या सदर रुग्णालयात झाला प्लॅस्टिकच्या बाळाचा जन्म

हे जग चमत्कारांनी भरलेले आहे. या जगात कधी आणि कुठे काय घडेल हे सांगता येणं अशक्य आहे. असाच काहीसा प्रकार घडला आहे बिहारच्या औरंगाबादच्या सदर रुग्णालयात. येथे नवजात शिशु युनिट मध्ये घडला असून येथे एका महिलेने प्लास्टिक मध्ये गुंडाळलेल्या बाळाला जन्म दिला आहे. त्याचे शरीर कातड्याने नवे तर प्लास्टिक सारख्या वस्तूने झाकलेले आहे. 
औरंगाबाद सदर रुग्णालयाच्या आवारात असलेले नवजात सुश्रुषा युनिट मध्ये उपचार घेत असलेल्या या बाळाला कॅलोडियन नावाचा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या या बाळाच्या हात-पायांची बोटे जोडलेली असून   संपूर्ण शरीर प्लास्टिकच्या थराने झाकलेले आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांना प्लास्टिक बेबी असेही म्हटले जाते.