सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 22 सप्टेंबर 2024 (15:54 IST)

महिलेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या, आरोपींना अटक

murder
छत्तीसगढ़च्या जशपूर नगर जिल्ह्यात जशपूर शहरात जरिया-भभरी गावात जंगलात एका 30 फूट दरीत 72  तासांपूर्वी एका महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असून मृतदेह दरीत फेकले. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

 महिले कडून काही कामासाठी उसने पैसे मागितले. नंतर मागितल्यावर महिलेवर मारहाण करून बलात्कार केला. महिलेने पोलिसांना सर्व सांगण्याची धमकी दिली. नंतर आरोपींनी  नंतर काठीने मारहाण केली आणि  तिचा गळा आवळून खून केला. नंतर मृतदेह तिथेच फेकून गेले.

काही स्थानिकांनी मृतदेह बघितल्यावर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेची ओळख न पटल्याने मृतदेह शवविच्छेदन करून शवगृहात ठेवले आहे. 

महिला जशपूर येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होती. घटनेच्या रात्री आरोपी रात्री तिला भेटायला आल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी शोध घेता तर आरोपींपर्यंत पोहोचले. पोलिसानी तपास केल्यावर या प्रकरणी दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले आहे. 
Edited By - Priya Dixit