शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

भय्यू महाराजांना एक तरुणी करत होती ब्लॅकमेल, 40 कोटी रुपयांची मागणी

इंदूर- राष्ट्रसंत भय्यू महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. पाच कोटीची मागणीच्या आरोपाखाली धरण्यात आलेल्या भय्यू महाराजांच्या ड्रायवरने नवीन खुलासे करत पोलिसांना हैराण केले आहे.
 
पोलिस चौकशीत ड्रायवरने सांगितले की आश्रमाहून जुळलेल्या एक तरुणी महाराजांना ब्लॅकमेल करत 40 कोटी रुपये नगद, मुंबईत फोर बीएचके फ्लॅट, 40 लाखाची कार आणि स्वत:साठी मुंबईच्या मोठ्या कॉर्पोरेट हाउसमध्ये नोकरीची मागणी करत होती.
 
ही बाब कळल्यावर तपासणी आता वेगळ्या दिशेला वळली. 50 वर्षीय भय्यू महाराज उर्फ उदय सिंह देशमुख यांनी या वर्षी 12 जून रोजी स्वत:च्या निवासावर गोळी झाडून आत्महत्या केली होती.
 
दोन खास सेवादार होते सामील : चौकशीत उघडकीस आले आहे की या षडयंत्रात महाराजांचे दोन खास सेवादार सामील होते. तरुणी स्वत:कडे ऑडियो आणि व्हिडिओ असल्याचे सांगत महाराजांना धमकी देत होती. 
 
तिन्ही आरोपी रिमांडवर : पोलिसांनी ड्रायवर कैलाश पाटिल, अनुराग राजोरिया आणि सुमित चौधरी या तिघांना रिमांडवर घेतले असून चौकशी करत आहे.