सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मे 2024 (17:38 IST)

स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन झाल्याची आपची कबुली, केजरीवाल करणार कारवाई

अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयात स्वाती मालीवाल यांच्या सोबत गैरवर्तनच्या घटनेची दखल आम आदमी पक्षाने घेतली असून या प्रकरणी योग्य कारवाई करण्याचे म्हटले आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत स्वाती मालीवाल यांच्यासह गैरवर्तन झाल्याचे म्हटले असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.  

संजय सिंग म्हणाले, काल एक अतिशय निंदनीय घटना घडली. काल स्वाती मालीवाल या अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आल्या होत्या आणि तिथे अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार तेथे आले आणि त्यांनी स्वाती यांच्यासोबत गैरवर्तन केले. स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली असून या प्रकरणात अरविंद केजरीवाल दखल घेणार असून कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.34 वाजता पीएस सिव्हिल लाईन्स येथे पीसीआर कॉल आला. ज्यामध्ये एका महिलेने सीएम हाऊसमध्ये आपल्यावर हल्ला केल्याचे सांगितले. काही वेळाने खासदार मॅडम ठाणे सिव्हिल लाइन्समध्ये आल्या, मात्र नंतर तक्रार करणार असल्याचे सांगून निघून गेल्या

Edited by - Priya Dixit