शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2022 (17:27 IST)

वास्तूशास्त्रज्ञ चंद्रशेखर अंगडी उर्फ 'मानव गुरू' यांची हुबळी येथे हत्या

murder
विविध वाहिन्यांवरील जाहिरातींमध्ये झळकणारे वास्तूशास्त्रज्ञ चंद्रशेखर अंगडी उर्फ चंद्रशेखर गुरुजी यांचा हुबळी येथे चाकुने भोसकून खून करण्यात आला आहे. हुबळी येथे आज दुपारी ही घटना घडली आहे.
 
अंगडी चंद्रशेखर गुरुजी नावाने महाराष्ट्र आणि कर्नाटकात ओळखले जात. हॉटेलमधल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. बळीच्या एका हॉटेलमध्ये जाऊन तिथे बसताना दिसत आहेत. त्या हॉटेलमध्येच ते थांबले होते.
 
दोन तरुण मुलं तिथे आले, त्यांना नमस्कार केला. त्यातील एक व्यक्ती त्यांच्या पाया पडायला वाकला. दुसऱ्या माणसाने त्याला भोसकलं. एका पांढऱ्या कापडाच्या आत तिने हा चाकू लपवले होते. दुसऱ्या माणासानेही मग भोसकायला सुरुवात केली.
 
अंगडी यांनी स्वरसंरक्षण करण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही.
 
"मारेकऱ्यांची ओळख पटली आहे. आम्ही या हत्येचा मागचा उद्देश शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. वैयक्तिक वैमनस्यातून हत्या झाल्याचं दिसत आहे," असं कर्नाटकाच्या कायदा आणि सुव्यवस्थेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमारन यांनी बीबीसी हिंदीला सांगितलं.
 
या हत्येची चौकशी करण्यासाठी पोलिसांची एक टीम तयार करण्यात आली आहे. चंद्रशेखर अंगडी बागलकोट जिल्ह्यातले होते. त्यांन सरल वास्तू या संस्थेची स्थापना केली होती. त्यांचं सरल जीवन नावाचं एक चॅनल होतं. कन्नड आणि मराठी टीव्ही चॅनलवर त्यांचा कार्यक्रम रोज येतो.
 
त्यांचा मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.
 
चंद्रशेखर अंगडी कोण होते?
अंगडी यांचा जन्म बागलकोट जिल्ह्यात विरुपक्षप्पा आणि नीलमा अंगडी यांच्या पोटी झाला. त्यांना लहानपणापासूनच सैन्यात जायची इच्छा होती. पण शारीरिक मानदंडात न बसल्याने त्यांची निवड होऊ शकली नाही. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे, अशी माहिती त्यांच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.
 
एका बांधकाम कंपनीत काम केल्यानंतर गुरुजींनी त्यांची कंपनी सुरू केली. 1999 च्या सुरुवातीच्या काळापर्यंत ते यशस्वी बांधकाम व्यावसायिक होते. त्या व्यवसायातही त्यांना बराच तोटा झाला. त्यानंतर ते वास्तूशास्त्राकडे वळले.
 
मानव अभिवृद्धी अभियानाअंतर्गत त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केलं. तसंच मोठ्या प्रमाणात गाव दत्तक घेण्याचा कार्यक्रम त्यांनी राबवला. तसंच कर्नाटकात ग्रामीण भागात त्यांनी शाळाही सुरू केली.