गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 3 मे 2018 (15:44 IST)

संभाजी भिडेला अटक व्हावी - नवाब मलिक

भिमा-कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडे याला अटक व्हावी या मागणीसाठी एका तरुणाने आज मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही फार गंभीर बाब आहे. सरकारने आताच जागं व्हायला हवं. भिडेला अटक व्हावी या मागणीसाठी दलित समाजाची भावना किती तीव्र आहे हे यातून दिसून येते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते व प्रदेश उपाध्यक्ष @NawabMalik यांनी केले. आरोपीला अटक करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण सरकार टाळाटाळ करत आहे. सरकारने याची दखल घ्यावी. सरकारने याबाबतीत गंभीर व्हायला हवे. सरकारने तात्काळ कारवाई करावी. सरकार काहीच करत नाही म्हणून जनता हा मार्ग निवडत आहे, असे मलिक म्हणाले.

आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी आघाडीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. आमची मागणी चार जागेची होती त्यासाठी आम्ही आजही आग्रह आहोत. तीन जागा या आमच्या आहेत चौथ्या जागी आमचे संख्याबळ जास्त आहे. संध्याकाळपर्यंत याबाबत निर्णय घेतला जाईल आणि त्यापद्धतीने अधिकृत घोषणाही केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. भाजप - सेनेचा पराभव कसा होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लातूर-उस्मानाबाद-बीड येथे राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त आहे. एक एक जागा निवडून आणणे सध्या गरजेचे आहे. त्यासाठी दोन्ही काँग्रेसने प्रयत्न करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.