सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :अहमदाबाद , मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 (12:00 IST)

परप्रांतियांवर हल्ला प्रकरण : 50 हजार यूपी, बिहारींनी सोडले गुजरात

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरुद्ध उसळलेल्या हिंसेनंतर गेल्या आठवड्याभरात 50 हजार मजूर उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परतले आहेत. तर दुसरीकडे उत्तर भारतीयांच्या पलायनाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याऐवजी भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.
 
गुजरातध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर गुजराती लोकांकडून उत्तर भारतीयांना बेदम चोप देण्यात येत असल्याने बिहार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री खडबडून जागे झाले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याशी चर्चा करून मजुरांच्या सुरक्षेबाबत घेण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. दोषींना शिक्षा द्या पण संपूर्ण समाजाला वेठीस धरू नका असे तंनी सांगितल्यानंतर दोघांनाही रूपानी यांनी सुरक्षेची हमी दिली.