गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (19:29 IST)

Azadi ka Amrit Mahotsav: मोदी सरकारचा मोठा निर्णय - ताजमहाल-कुतुबमिनार सारखी स्मारके मोफत पाहा

Azadi ka Amrit Mahotsav: देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. अशा परिस्थितीत केंद्रातील मोदी सरकारने देशाला आणखी एक मोठी भेट दिली आहे. बुधवारी, सरकारने सांगितले की, स्वातंत्र्य दिन साजरा करताना, 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत, सर्व सरकारी संग्रहालये आणि स्मारकांमध्ये पर्यटकांना प्रवेश विनामूल्य असेल.
 
 "'आझादी का अमृत महोत्सव' आणि 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने 5 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत देशभरातील सर्व संरक्षित स्मारके/स्थळांना अभ्यागत/पर्यटकांसाठी मोफत प्रवेश दिला आहे," सरकारने सांगितले. दिले आहे."