मोठी बातमी ! लष्कर निवड मंडळाने पाच महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर बढती देण्यास मान्यता दिली
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की,सिग्नल कोर, इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) कोर आणि इंजिनीअर्स कोर मध्ये सेवा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर पदोन्नती देण्यास मान्यता देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
लष्कर निवड मंडळाने पाच महिलाअधिकाऱ्यांना कर्नल पदावर बढती देण्यास मान्यता दिली आहे.संरक्षण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की,लष्कराच्या निवड मंडळाने 26 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर पाच महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला आहे. मंत्रालयाने सांगितले की,सिग्नल कोर,इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स (ईएमई) कोर आणि कोर ऑफ इंजिनीअर्समध्ये सेवा देणाऱ्या महिला अधिकाऱ्यांना कर्नल पदावर पदोन्नती देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यापूर्वी कर्नल पदावर पदोन्नती फक्त आर्मी मेडिकल कोर (एएमसी), जज अॅडव्होकेट जनरल (जेएजी) आणि आर्मी एज्युकेशन कोर (एईसी) मधील महिला अधिकाऱ्यांना लागू होती.'कर्नल टाइम स्केल' रँकसाठी निवडलेल्या पाच महिला अधिकारी म्हणजे सिग्नल कोर मधील लेफ्टनंट कर्नल संगीता सरदाना, ईएमई कोर मधून लेफ्टनंट कर्नल सोनिया आनंद आणि लेफ्टनंट कर्नल नवनीत दुग्गल आणि इंजिनियर्स कोर मधून लेफ्टनंट कर्नल रिनू खन्ना आणि लेफ्टनंट कर्नल रिचा सागर यांचा समावेश आहे.
सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जवळजवळ एक आठवड्यानंतर आला आहे या मध्ये महिला उमेदवारांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA)स्पर्धा परीक्षेला बसण्यासाठी हिरवा सिग्नल देण्यात आला आहे.या परीक्षेत फक्त पुरुष विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी होती.लष्करात महिलांना कायमस्वरूपी कमिशन देण्याच्या दिशेने हा एक मोठा निर्णय मानला जात आहे.