सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (13:34 IST)

देशातील अनेक CRPF शाळांना बॉम्बची धमकी

bomb threat
दिल्ली सोबत देशातील अनेक CRPF शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. रोहिणी बॉम्ब ब्लास्ट नंतर ईमेल व्दारा CRPF शाळांना इशारा देण्यात आला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील रोहिणीमध्ये CRPF शाळेजवळ झालेल्या ब्लास्टचे प्रकरण अजून उलगडले नाही तर आता देशातील CRPF शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार CRPF शाळांना बॉम्ब थ्रेट पाठवण्यात आले आहे. सोमवारी सकाळी देशातील अनेक CRPF शाळांना ईमेलवर बॉम्बची धमकी मिळाली असून ज्याची पोलिस स्टेशनमध्ये   तक्रार करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
 
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील CRPF शाळेला सर्वप्रथम धमकी मिळाली होती. यानंतर शाळा प्रशासनाने हा संदेश देशातील सर्व CRPF शाळांना पाठवला. काही वेळातच अनेक शाळांना एकामागून एक बॉम्बच्या धमक्या मिळू लागल्या. दिल्लीतील 2 CRPF शाळा आणि हैदराबादमधील CRPF शाळेलाही असाच ईमेल प्राप्त झाला आहे. या धमक्यांनी संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

Edited By- Dhanashri Naik