रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: जयपूर , सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (19:02 IST)

जयपूरमध्ये प्रियकर आणि प्रेयसीने झाडाला लटकून जीव दिला

जयपूरयेथे प्रियकर आणि प्रेयसीचे लग्न न होण्याची शक्यतेमुळे दोघांनी एकमेकांच्या साथीनं एकाच ओढणीने कंबरेला बांधून झाडाला लटकून जीव दिला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  
 
राजस्थानमधील डुंगरपूरमध्ये राहणाऱ्या प्रवीण आणि रिना या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र त्यातील प्रियकराचं घरच्या लोकांनी जबरदस्ती लग्न लावून दिलं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रेमप्रकरणात मोठा अडथळा निर्माण झाला होता. दोघांना एकमेकांशी लग्न करण्याची इच्छा असताना प्रियकराच्या पत्नीचं काय करायचं, हा विचार दोघांनाही अस्वस्थ करत होता. एकमेकांशी लग्न होण्याची कुठलीही शक्यता ‍न दिसल्याने दोघांनी हा निर्णय घेतला.  
 
घरापासून काही अंतरावर असणाऱ्या रस्त्यावरील झाडाला लटकून फाशी घेण्याचं त्यांनी निश्चित केलं. त्यासाठी त्यांनी दोन साड्या आणि एका ओढणीचा उपयोग केला. दोघांनी ओढणी आपल्या कंबरेभोवती गुंडाळली आणि साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गावकऱ्यांना अचानक झाडावर लटकणारे दोन मृतदेह दिसल्यानंतर धक्का बसला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला.