गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 22 मे 2018 (13:54 IST)

आम्हाला जाऊ द्या ना घरी...

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते कुारस्वामी बुधवारी मुख्यंत्रिपदाची शपथ घेणार असून गुरुवारी बहुमत सिद्ध करणार आहेत. दरम्यान जोपर्यंतकुमारस्वामी बहुमत सिद्ध करत नाहीत तोपर्यंत काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना हॉटेलधून बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. निकाल लागल्यापासून हॉटेलमध्ये राहणार्‍या आमदारांना मात्र आता घराची आठवण येऊ लागली आहे.
 
दोन्ही पक्षांनी रविवारी सकाळी आपापल्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात पाठवण्याचा निर्णय घेतला होता. 15 मे पासून आमदार आपल्या कुटुंबापासून दूर आहेत. अनेक आमदारांना आपल्या घरी परतण्याची इच्छा असून, आपल्या नेत्यांकडे त्यांनी ती व्यक्तही केली होती. मात्र अचानक पक्षांनी आपला निर्णय बदलत गुरुवारपर्यंत आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बाहेर गेल्यानंतर भाजप आमदारांना गळाला लावण्याचा प्रयत्न करेल अशी भीती दोन्ही पक्षांना आहे. एकदा तरी आपल्या घरी जाण्याची परवानगी देण्याची आमदारांची मागणीही फेटाळण्यात आली आहे.  
 
काँग्रेसचे आमदार हिल्टॉन हॉटेलमध्ये राहत असून, जेडीएसच्या आमदारांना एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. जोपर्यंत बहुमत सिद्ध होत नाही, तोपर्यंत आमचे आमदार हॉटेलमध्येच राहणार.