गुरूवार, 22 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 14 जानेवारी 2023 (09:55 IST)

काँग्रेस खासदार संतोख सिंह यांचे निधन

पंजाबमधील जालंधर येथील काँग्रेसचे खासदार चौधरी संतोख सिंह यांचे आज निधन झाले. भारत जोडो यात्रेत ते सहभागी झाले होते थे त्यांची अचानक तब्येत बिघडली. तातडीनं त्यांना फगवाडा येथील विर्क रुग्णालयात नेण्यात आले. येथे त्यांचा मृत्यू झाला.  ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत फिरत असताना त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले. संतोख सिंह यांची प्रकृती खालावताच राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा थांबवली आणि तात्काळ हॉस्पिटल गाठले. 
 
आज सकाळी 7 वाजता लुधियानाच्या लोदोवाल येथून राहुल गांधींचा प्रवास सुरू झाला. ही यात्रा जालंधरमधील गोराया येथे सकाळी १० वाजता पोहोचणार होती, तिथे जेवणासाठी ब्रेक होणार होता. त्यानंतर दुपारी ३ वाजता हा प्रवास पुन्हा सुरू होऊन  आणि सायंकाळी ६ वाजता फगवाडा बस स्थानकाजवळ थांबेल. आज यात्रेचा रात्रीचा मुक्काम कपूरथला येथील कोनिका रिसॉर्टजवळील मेहत गावात होता, मात्र आज सकाळी 9.30 च्या सुमारास काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन झाल्याने यात्रा थांबवण्यात आली आहे. 
आज ही यात्रा थांबवली जाणार की राहुल गांधी पुन्हा यात्रेत सहभागी होणार याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.  

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी जालंधरमधील काँग्रेस खासदाराच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, "जालंधरचे काँग्रेस संतोख सिंग चौधरी यांच्या अकाली निधनाने मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो." 
 
Edited By- Priya Dixit