शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (18:00 IST)

मांसांहार करणाऱ्यांना शासन करण्यासाठी आला करोना विषाणू अवतार

चीनमध्ये करोना विषाणूच्या संसर्गामुळे हजारो बळी गेले असून विषाणूंचा संसर्ग अनेक देशांमध्ये पसरला आहे. यावर जगभरात शोध सुरु असून संसर्गावर उपाय शोधण्यासाठी वैज्ञानिक रात्रदिवस एक करत आहे. दरम्यान एक विचित्र तर्क समोर येत आहे. हिंदू महासभेने म्हटले की करोना विषाणू गरीब प्राण्यांना वाचवण्यासाठी पृथ्वीवर आलेला अवतार आहे. 
 
आखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपानी यांनी आपले मत व्यक्त करत म्हटले की मांसाहार करणार्‍यांना शासन करण्यासाठी हा अवतार आला आहे. हा अवतार मृत्यूचा संदेश आहे. त्यांनी म्हटले की चीनला हा एक धडा आहे आणि आता त्यांना शाकाहारी होण्याची गरज आहे.
 
विचित्रपणा येथेच थांबत नाही तर ते हे देखील म्हणाले की चीनने करोनाच्या मूर्तीची स्थापना करुन त्यांची माफी मागावी. त्यांनी सल्ला दिला की या जीवाला धोकादायक असणार्‍या साथीमधून बाहेर येण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपींग यांनी करोनाची मूर्ति उभारुन माफी मागावी. चीनमधील मांसाहारी लोकांनी कोणत्याही निर्दोष जीवांना त्रास देणार नाही अशी शपथ घ्यावी. असे केल्याने करोनाचा राग शांत होईल आणि हा अवतार त्याच्या जगात परत जाईल.
 
देवपूजा करणार्‍या आणि गोमातेची रक्षा करणार्‍या भारताला या विषाणूपासून धोका नसल्याचा दावा देखील चक्रपानी यांनी केला आहे.