निर्भयाच्या दोषींवर 'Death Warrant' जारी, 3 मार्चला फाशी
निर्भया प्रकरणात पटियाला हाऊस न्यायालयाकडून डेथ वॉरंट जारी करण्यात आलंय. 3 मार्च रोजी सकाळी सहा वाजता निर्भयाच्या दोषींना फासावर चढवण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.
यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयानं डेथ वॉरंटमध्ये 22 जानेवारी रोजी दोषींना फासावर लटकावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा 1 फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, न्यायालयानं 31 जानेवारी रोजी एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबवली होती.
11 फेब्रुवारी रोजी निर्भयाच्या आई-वडिलांनी दोषींविरुद्ध डेथ वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली होती.
निर्भयाच्या दोषींसाठी फाशीची नवीन तारीख निश्चित करण्यात आली आहे. निर्भया कुटुंबाची वकील सीमा कुशवाहा यांनी सांगितले की दोषींना कुणीही वाचवू शकत नाही.