रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (15:27 IST)

पिके जाळू पण मागे हटणार नाही

दिल्लीच्या सीमांजवळ तीन महिन्यांपासून सुरू असणार्या शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आंदोलक शेतकरी मागे हटणार नाहीत, पिके जाळू पण आंदोलन सुरुच ठेवू, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, पीक पेरणी आणि शेतीच्या इतर कायद्यांसाठी शेतकरी परत जातील असा गैरसमज केंद्र सरकारने करून घेऊ नये. जर त्यांनी बळजबरी केली तर आम्ही आमची पिके जाळू पण आंदोलनातून मागे हटणार नसल्याची भूमिका टिकैत यांनी मांडली.
 
पुढे बोलताना ते म्हणाले की, हे आंदोलन दोन महिन्यामध्ये थंड होईल असा समज सरकारने करून घेऊ नये. आम्ही शेतीही करू आणि आंदोलनही सुरू ठेवू. यावेळी केंद्र सरकार शेतकर्यांशी चर्चा करायला तयार आहे. मग, संघटना नेते केंद्राला प्रस्ताव का देत नाहीत, या प्रश्नाला उत्तर देताना टिकैत यांनी म्हटले, आम्ही देखील केंद्राशी चर्चा करायला तयार आहोत. आम्ही प्रस्ताव यापूर्वीच दिले आहेत. यासाठी 98 लाख रुपये खर्च येईल.