मंगळवार, 17 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 ऑक्टोबर 2024 (11:31 IST)

बेंगळुरूमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले

suicide
कर्नाटकात एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकमधील  बेंगळुरू मध्ये एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत आढळले आहे. सोमवारी 14 ऑक्टोबर रोजी एका वरिष्ठ पोलीस अधिकारींनी या घटनेची माहिती दिली आहे. अविनाश वय 33 असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पत्नीचे नाव ममता असून ती 30 वर्षांची आहे. यासोबतच त्याच्या पाच आणि तीन वर्षांच्या मुलींची ओळख पटली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार अविनाश हा कॅब ड्रायव्हर होता आणि त्याचा मृतदेह त्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. तर इतर लोक घरात मृतावस्थेत आढळले. अविनाशचे कुटुंब कलबुर्गी जिल्ह्यातील रहिवासी असून गेल्या पाच-सहा वर्षांपासून येथे राहत होते. तसेच बेंगळुरू (ग्रामीण) पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, अविनाशचा भाऊ सकाळी आला तेव्हा कोणीही दरवाजा उघडला नाही, म्हणून त्याने दरवाजा तोडला आणि आत प्रवेश केला तर सर्वजण मृतावस्थेत आढळले.  
 
तसेच अविनाशच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू कसा झाला, याचा तपास सुरू असून एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत सापडल्याने ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या कुटुंबाच्या मृत्यूमागची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत.  

Edited By- Dhanashri Naik