मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मेट्रोमध्ये खाली बसून प्रवास पडला महागात, 38 लाख दंड

दिल्लीत मेट्रोमध्ये खाली बसून प्रवास करणे शेकडो प्रवाशांना महागात पडले. दिल्ली मेट्रोने मागील 11 महिन्यात रेल्वेच्या फरशीवर बसून प्रवास करत असलेल्या लोकांना 38 लाख रूपये दंड केला.
 
एका आरटीआय उत्तरामध्ये दिल्ली मेट्रोने सांगितले की अस्वच्छता, अडथळा आणणे, उचित टोकनविना प्रवास करणार्‍या आणि अधिकार्‍यांच्या कामात अडथळा निर्माण करण्याच्या विभिन्न गुन्ह्यांसाठी जून 2017 ते मे 2018 दरम्यान 51,000 लोकांकडून एकूण 90 लाख रुपयांची वसुली केली गेली.
 
डीएमआरसीने म्हटले की यातून सर्वाधिक वसुली खाली बसून प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून करण्यात आली आहे. अंदाजानुसार ट्रेनमध्ये खाली बसण्यासाठी 19,026 लोकांवर दंड ठोठावण्यात आला.