1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 7 जून 2025 (14:19 IST)

दिव्यांग क्रिकेटपटूचा ट्रेनमध्ये मृत्यू, रेल्वेने चौकशीचे आदेश दिले

vikram singh
पंजाबचा अपंग क्रिकेटपटू विक्रम सिंग, जो लुधियानाहून ग्वाल्हेरला क्रिकेट स्पर्धेत भाग घेण्यासाठी जात असताना त्याची प्रकृती अचानक बिघडल्याने छत्तीसगड एक्सप्रेस ट्रेनमध्ये मृत्यू झाला.
अधिकृत माहितीनुसार, 4 जून रोजी सकाळी 39 वर्षीय विक्रम सिंग यांचे मथुरा जंक्शनजवळ ट्रेन पोहोचण्याच्या बेतात असताना निधन झाले. विक्रम त्याच्या संघासह ग्वाल्हेरमध्ये होणाऱ्या सातव्या श्रीमंत माधवराव सिंधिया मेमोरियल टी-10 चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्यासाठी जात होता, जी 5 जूनपासून सुरू होणार होती.
 
विक्रम सिंगचे सहकारी सोमजीत सिंग गौर याने एका निवेदनात म्हटले आहे की, पहाटे 4:58 वाजता रेल्वे हेल्पलाइन नंबरवर कॉल करण्यात आला आणि वैद्यकीय मदत मागितली गेली. परंतु, वेळेवर मदत न मिळाल्याने, सकाळी 8:10 वाजता विक्रम सिंगचा मृत्यू झाला.

वारंवार फोन करूनही वैद्यकीय पथक आले नाही आणि मथुरा जंक्शनसमोर ट्रेन दीड तास उभी होती, असा आरोप संघातील सहकारी करत आहे. तो आमच्या डोळ्यांसमोर वेदनेने तडफडत राहिला आणि नंतर त्याचा मृत्यू झाला आणि आम्ही काहीही करू शकलो नाही.
दिव्यांग खेळाडू विक्रम सिंगचा ट्रेनमध्ये मृत्यू झाल्यानंतर, जीआरपीने त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील कारवाई सुरू केली आहे. त्याच वेळी, विक्रमच्या कुटुंबाला माहिती दिल्यानंतर, उर्वरित संघातील सदस्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्वाल्हेरला रवाना झाले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, रेल्वेने चौकशीचे आदेश दिले आहेत. 
Edited By - Priya Dixit