1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2016 (18:03 IST)

चक्क महामार्गावर केले ८ लढाऊ विमानांनी लँडिंग

देशातील सर्वात मोठ्या असलेल्या आग्रा-लखनऊ  महामार्गाचे उद्घाटन करत असतांना चक्क भारतीय हवाई दलाच्या आठ लढाऊ विमानांनी  महामार्गावर लँडिंग केले. अशाप्रकारे महामार्गाच्या उद्घाटनाला विमाने सहभाग होण्याची ही पहिलीच वेळ.  यात हवाई दलाच्या 4 सुखोई आणि 4 मिराज विमानांचा समावेश होता. यानिमित्ताने आणीबाणीच्या प्रसंगी देशातील हवाई तळ व्यस्त असल्यास महामार्गांचा धावपट्टीसारखा वापर करता येऊ शकतो का याची चाचपणी संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आली.  यावेळी सुखोई विमानांनी बरेलीहून तर मिराज विमानांनी ग्वाल्हेरहून टेकऑफ करुन महामार्गावर लँडिंग केले. सुमारे 302 किमी लांबीच्या या महामार्गाच्या निर्मितीसाठी सुमारे 15000 कोटी खर्च करण्यात आले आहेत. तर अवघ्या 23 महिन्यात महामार्ग बनवण्यात आला आहे.