गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (17:02 IST)

माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या नातीने गळफास लावून आत्महत्या केली

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या हिचा मृतदेह बेंगळुरूमधील एका खाजगी अपार्टमेंटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ती 30 वर्षांची होती. हे प्रकरण आत्महत्याचे आहे की अन्य काही प्रकरण आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. बीएस येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार, बोरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये तिचे पोस्टमॉर्टम करण्यात आले आहे.
 
 सौंदर्या फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळली तेव्हा तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सौंदर्या व्यवसायाने डॉक्टर असून मध्य बेंगळुरू येथील तिच्या फ्लॅटमध्ये राहत होती. सौंदर्याला सहा महिन्याची मुलगी आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गरोदरपणानंतर सौंदर्यामध्ये तणावाची लक्षणे दिसू लागली होती. सौंदर्या ही येडियुरप्पा यांची धाकटी मुलगी पद्मा यांची मुलगी आहे. प्राथमिक अहवालानुसार ती बंगळुरू येथील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली.
 
सौंदर्याचा विवाह 2019 मध्ये डॉ नीरजसोबत झाला होता. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घरातील नोकराने खोलीचा दरवाजा ठोठावला असता. आतून काहीच प्रतिसाद न आल्याने डॉ.नीरजला बोलावण्यात आले. नीरजने दार उघडले असता बेडरूममध्ये सौंदर्या पंख्याला लटकलेली दिसली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रथमदर्शनी पुराव्यावरून हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे समजते.