बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 24 एप्रिल 2019 (12:44 IST)

कर्नाटकात पत्नी आणि तीन मुलांची क्रूर हत्या केल्याबद्दल अभियंताला अटक केली

गाजियाबादमधील इंदिरापुरमच्या ज्ञानखंडमध्ये बायको आणि तीन मुलांना बेशुद्ध करून त्यांची हत्या करणारा इंजिनियर सुमितला पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली आहे. तो रविवारी सकाळी तीन वाजेच्या सुमारास आपल्या घरातून पळून गेला होता. नंतर त्याने आपल्या पारिवारिक व्हाट्सएप ग्रुपवर व्हिडिओ टाकून घटनेबद्दल माहिती दिली होती.

त्याच्या मेसेज मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसाला ही माहिती दिली होती आणि इंदिरापुरमच्या ज्ञानखंड स्थित त्याच्या घरातून चारी शव सापडले होते. सुमितला कर्नाटकाच्या उड्डुपिहून अटक करण्यात आले आहे. 
 
भावाला घेऊन आरोपी इंजिनियराचा शोध घेत होती पोलिस 
ज्ञानखंड चारच्या फ्लॅटमध्ये शनिवारी रात्री बायको आणि तीन मुलांची घृणास्पद हत्या करणार्‍या आरोपी इंजिनियर सुमितला चार दिवसांनंतर अटक केले आहे.  
 
मंगळवारी पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले होते. त्याची शेवटची लोकेशन महाराष्ट्र-कर्नाटक बार्डरवर मिळाली होती. याच आधारावर पोलिसांनी त्याला अटक केले.  
 
पोलिसांच्या अनुसार बायको अंशुबाला आणि तीन मुलं प्रथिमेष, आरव आणि आकृतीची हत्या करणार्‍या इंजिनियराचा मोबाइल बंद येत होता. हत्या केल्यानंतर सुमितची लोकेशन मध्यप्रदेशाच्या रतलाममध्ये मिळाली होती.  
 
त्याने आपला व्हिडिओ ट्रेनमध्ये बनवला होता, कारण व्हिडिओत बॅकग्राऊंडमध्ये ट्रेनच्या टायलेट आहे. म्हणून पोलिसांची वेग वेगळी टीम गैर राज्यांमध्ये आणि रेलवे स्टेशनावर सुमितचा शोध घेत होती. तसेच आरपीएफ व जीआरपीला देखील लावण्यात आले होते.