बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 8 एप्रिल 2023 (12:56 IST)

घाणेरड्या कपड्यांमध्ये मुली शूर्पणखासारख्या दिसतात : कैलाश विजयवर्गीय

इंदूर - भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय (BJP General Secretary Kailash Vijayvargiya) यांनी वादग्रस्त विधान करत म्हटले की 'घाणेरडे कपडे' घालून बाहेर पडलेल्या मुली शूर्पणखासारख्या दिसतात. भारतीय मूल्यांचे आवाहन करत त्यांनी मुलींना 'चांगले कपडे' घालण्याचा सल्लाही दिला आहे.
 
उल्लेखनीय म्हणजे भारतीय पौराणिक ग्रंथ रामायणात शूर्पणखाचे वर्णन रावणाची बहीण म्हणून केले गेले आहे आणि आख्यायिकेनुसार, भगवान रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण याने शूर्पणखाचे नाक तिच्या असभ्य वर्तनासाठी कापले.
 
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की विजयवर्गीय यांनी बुधवारी रात्री महावीर जयंती आणि हनुमान जयंती संदर्भात एका स्थानिक सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाच्या मंचावरून आपल्या भाषणात या प्रकारे वक्तव्य केले. त्यांच्या विधानाचा वादग्रस्त भागाचा व्हिडिओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.
 
व्हिडिओमध्ये विजयवर्गीय इंदूरमध्ये तरूण रात्री दारूच्या नशेत फिरताना दिसतात यावरुन चिंता व्यक्त करत स्थानिक लोकांना त्यांच्या मुलांना चांगले संस्कार देण्याची आवाहन करताना दिसत आहे. ते म्हणाले की, मी आजी-आजोबा, पालकांना सांगतो की, शिक्षणाची गरज नाही, संस्कार आवश्यक आहेत.
 
विजयवर्गीय म्हणाले की, जेव्हा मी रात्री बाहेर जातो आणि सुशिक्षित तरुणांना नशेत झूमताना बघतो तेव्हा मला खरोखरच गाडीतून उतरून त्यांना पाच-सात लावून नशा उतरवून द्यावा अशी इच्छा होते. मी देवाची शपथ घेतो. मी हनुमान जयंतीला खोटे बोलत नाही.
 
भाजपचे सरचिटणीस इथेच थांबले नाहीत. ते म्हणाले की, आपण महिलांना देवी म्हणतो, पण मुलीही असे घाणेरडे कपडे घालून बाहेर पडतात की त्यांच्यात देवीचे रूप दिसत नाही, त्या शूर्पणखासारख्या दिसतात... खरंच. देवाने इतकं छान आणि सुंदर शरीर दिलंय... छान कपडे घालायला हवेत.