गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2019 (12:25 IST)

जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट, दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता

गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर यंत्रणांना माहितीनुसार, हवाईदलाच्या श्रीनगर आणि अवंतीपुरा या तळांवर दहशतवादी हल्ला करण्‍याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.


 
दहशतवाद्यांकडून वेळेवेळी सीआरपीएफ जवानांच्या वाहनांचे ताफे, हवाईदलाचे तळ किंवा सैन्यदलाच्या छावण्यांना लक्ष्य करून हिंदुस्थानात घातपात करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात सुरक्षा बल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक होत आहे. यात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.