शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 17 मे 2023 (23:18 IST)

हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे निधन

Shrichand Parmanand Hinduja
हिंदुजा समूहाचे अध्यक्ष आणि चार हिंदुजा बंधूंपैकी ज्येष्ठ श्रीचंद परमानंद हिंदुजा यांचे बुधवारी लंडनमध्ये निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. हिंदुजा कुटुंबाच्या प्रवक्त्याने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. हिंदुजा हे काही दिवसांपासून आजारी होते.
 
प्रवक्त्याने सांगितले की, गोपीचंद, प्रकाश आणि अशोक हिंदुजा यांच्यासह संपूर्ण हिंदुजा कुटुंबाला अत्यंत दुःखाने कळवत आहे की, कुटुंबाचे प्रमुख आणि हिंदुजा समूहाचे अध्यक्ष एसपी हिंदुजा यांचे निधन झाले आहे. भारतीय वंशाच्या हिंदुजा यांनी नंतर ब्रिटिश नागरिकत्व घेतले आणि ते लंडनमध्ये राहिले. फोटो सौजन्यः ट्विटर