रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जून 2018 (09:07 IST)

नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द करण्याचे जाहीर केल्यावर तीन लाख कोटींचा करार झालाच कसा? – नवाब मलिक

कोकणात नाणार प्रकल्पावरुन सुरू झालेला वाद काही केल्या थांबत नाही. उद्धव ठाकरे आणि भाजपकडून राज्यातील जनतेची दिशाभूल केली जात आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जाहीर सभेत सांगितले होते की या प्रकल्पाचे नोटीफिकेशन आम्ही रद्द करत आहोत. मात्र दोन दिवसांपूर्वीच धमेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत नाणार प्रकल्पासाठी तीन लाख कोटींचा करार झाला. जाहीर सभेत सांगितल्याप्रमाणे जर नाणार प्रकल्पाचे नोटीफिकेशन रद्द केले असेल तर धमेंद्र प्रधान यांनी हा करार केलाच कसा? असा सवाल प्रमुख प्रवक्ते  नवाब मलिक यांनी केला. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
उद्धव ठाकरे भाजपच्या नेत्यांना मातोश्रीची पायरी चढू न देण्याची भाषा करतात. मात्र लोकांना यात रस नाही. त्यापेक्षा शिवसेनेचे मंत्री साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉकच्या पायऱ्या चढणे कधी थांबवतील हे जाणण्यात लोकांना रस आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या लोकांना मातोश्रीच्या पायऱ्या चढण्यास मज्जाव घालण्यापेक्षा आपल्या मंत्र्यांना मंत्रालयाच्या पायऱ्या चढू नका असा सल्ला देण्यास नवाब मलिक यांनी सांगितले. पर्यावरणाला दुषित करणारा प्रकल्प येऊ नये अशी भूमिका नवाब मलिक यांनी मांडली. लोकांना प्रकल्प नको असेल तर सरकारने माघार घ्यावी. जनतेवर अन्याय करू नये, अशी मागणी मलिक यांनी केली. हा प्रकल्प होत आहे म्हणून गुजरात आणि इतर राज्यातील लोकांनी येथे जमीन खरेदी केली. या खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली