रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (15:15 IST)

Aditya L1 आदित्यने काढला सेल्फी

Aditya-L1 Selfie
Aditya-L1 Selfie भारतीय अंतराळ संस्था इस्रोच्या सौर मिशन आदित्य एल 1 ने सेल्फी घेतला आहे. आदित्य L1 चे अनेक घटक या सेल्फीमध्ये दिसत आहेत. इस्रोने हे सोशल मीडियावर शेअर केले आहे. आदित्य L1 मध्ये बसवलेल्या कॅमेऱ्यात हा सेल्फी कैद झाला आहे. आदित्य एल1ने 4 सप्टेंबरला एक फोटोही काढला. या चित्रात पृथ्वी आणि चंद्र एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. हे चित्र अशा प्रकारे घेण्यात आले आहे की त्यात पृथ्वीचा मोठा भाग दिसत आहे, तर छायाचित्राच्या उजव्या बाजूला छोटा चंद्र दिसत आहे.