1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :श्रीनगर , सोमवार, 9 मार्च 2020 (16:42 IST)

जम्मू-काश्मीरमध्ये नवा राजकीय पक्ष

जम्मूकाश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवल्यानंतर या भागात राजकीय घडामोडींना ब्रेक मिळाला आहे. पणआता हा ब्रेक 'अपनी पार्टी' नावाच्या एका नव्या राजकीय पक्षाच्या उदयानं उठतोय. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा पक्ष पीडीपीला रामराम ठोकत सय्यद अल्ताफ बुखारी यांनी 'अपनी पार्टी' नावाचा नव्या राजकीय पक्षाची मूठ बांधली आहे. अल्ताफ बुखारी यांनी मेहबूबा मुफ्ती सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून काम पाहिले. या भाग्यातील  सामान्य लोकांचा हा पक्ष असेल, त्यामुळेच याचे नामकरण अपनी पार्टी असे करण्यात आल्याचे बुखारी यांनी म्हटले.
 
आमच्यासमोर खूप सार्‍या अपेक्षा आणि आव्हाने आहेत. मी जम्मू-काश्मीरच्या लोकांना विश्वास देऊ इच्छितो की, माझी इच्छाश्रती मजबूत आहे, असे आश्वासन बुखारी यांनी जनतेला दिले. माजी मंत्री आणि डेमोक्रेटिक पक्षाचे (राष्ट्रवादी) अध्यक्ष गुलाम हसन मीर, पीडीपीचे माजी आमदार दिलावर मीर, नूर मोहम्मद शेख, अशरफ मीर आणि माजी काँग्रेस आमदार फारुख अंद्राबी, इरफान नकीब या स्थानिक नेत्यांनी 'अपनी पार्टी'ला आपला पाठिंबा जाहीर केला. सय्यद अल्ताफ बुखारी यांनी या सर्व नेत्यांचे आपल्या पक्षात स्वागत केले आहे.
 
उल्लेखनीय म्हणजे, 5 ऑगस्ट रोजी संसदेत जम्मूकाश्मीरला विशेष दर्जा देणारे अनुच्छेद370 रद्द करणारे विधेयक संमत करण्यात आले होते. यानंतर हा भूभाग जम्मूकाश्मीर आणि लडाख अशा दोन वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागण्यात आला आहे. ऑगस्ट 2019 पासून फारुक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती हे काश्मीरचे तीनही नेते नजरकैदेत आहेत. त्यांच्यासह शाह फैजल, सरताज मदानी, हिलाल लोन, अली मोहम्मद सागर आणि नईम अख्तर यांच्यावरही सार्वजनिक सुरक्षा कायांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.