मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 मार्च 2022 (19:09 IST)

JEE Main परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

जेईई मेन परीक्षेच्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून जेईईची परीक्षा 5 दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. या सह NTA ने नवीन तारखा जाहीर केल्या आहेत.  
 
पूर्व निर्धारित वेळापत्रकानुसार, JEE Main एप्रिल 2022 परीक्षा 16 ,17 ,18 ,19 ,20 एप्रिल 2022 रोजी होणार होती. आता या परीक्षेच्या तारख्यात बदल करण्यात आला असून आता परीक्षा 21 एप्रिल पासून होणार आहे. NTA ने जाहीर केलेल्या नव्या तारख्या आता 21,24,25,29 ,एप्रिल आणि  1 आणि 4 मे 2022 रोजी आहे. 
परीक्षेच्या केंद्राबाबत सूचना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दिल्या जाणार. 
  
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जेईईच्या अधिकृत वेबसाईटवर jeemain.nta.nic.in वर क्लिक करून माहिती घ्यावी.