रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2024 (14:34 IST)

घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या

murder knief
राजस्थानमधील सवाई माधोपूर मध्ये घराबाहेर झोपलेल्या एका व्यक्तीची धारधार शस्त्राने हत्या करण्यात अली आहे. एक व्यक्ती रात्री घराबाहेर झोपला होता व शेजारी पत्नी देखील झोपली होती. या दरम्यान या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाला. या प्रकरणाची पोलीस चौकशी करीत आहे. 
 
सवाई माधोपूर जिल्ह्यातील आलनपूर मध्ये एका व्यक्तीच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. घराबाहेर झोपलेल्या या व्यक्तीचा मध्यरात्री खून करण्यात आला आहे. 45 वर्षीय रामहरी बैरवा यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आलनपूर छाबडि चौक मध्ये बैरवा मोहल्ला निवासी रामहरी बैरवा हे आपल्या मुलासोबत आणि पत्नीसोबत बाहेर झोपले होते. मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने अचानक रामहरी बैरवा यांच्यावर हल्ला केला. त्यांचा आवाजामुळे मुलगा आणि पत्नी जागे झाले व हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली. व पुढील चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

Edited By- Dhanashri Naik