1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 मे 2022 (09:13 IST)

लालू यादवांच्या अडचणीत पुन्हा वाढ, सीबीआयने गुन्हा नोंदवला, 15 ठिकाणी छापे

lalu prasad
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. चारा घोटाळ्यात जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर आलेल्या लालूंविरोधात सीबीआयने नवा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या 15 ठिकाणी छापेही टाकण्यात येत आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या काळात लालूप्रसाद यादव यांच्या कथित भ्रष्टाचाराबाबत ही कारवाई करण्यात येत आहे.
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लालू यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगी मिसा भारती यांच्या पाटणा, गोपालगंज आणि दिल्लीतील ठिकाणांवर कारवाई करण्यात येत आहे. रेल्वे भरती घोटाळ्याप्रकरणी आरजेडी नेत्यावर नवा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. 
.
73 वर्षीय नेत्याला नुकताच चारा घोटाळ्याच्या पाचव्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. चारा घोटाळ्यातील हे शेवटचे प्रकरण असून त्यात त्यांना जामीन मिळाला असून ते तुरुंगातून बाहेर आले आहेत.