सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (17:19 IST)

बिहारमध्ये मोठा अपघात, 15 जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत उलटली, 7 बेपत्ता, शोध सुरू

बिहारची राजधानी पाटणा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. पाटणा येथील मणेर महावीर टोला गंगा नंदी घाटावर प्रवाशांनी भरलेली बोट बुडाली. या बोटीवर एकूण 15 जण होते, त्यापैकी 7 जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी लोकांच्या मदतीने बोटीतील प्रवाशांचा शोध सुरू केला आहे. अपघाताच्या जागी मणेर पोलिसांसह अनेक अधिकारी उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील मणेर येथे गंगा नदीत एक बोट15जणांना घेऊन जात होती. यादरम्यान काही कारणाने बोट उलटली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. बोटीवरील लोक पाण्यात बुडू लागले. कसेबसे बाकीचे लोक नदीतून बाहेर आले. त्याचबरोबर सात जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.
Edited by : Smita Joshi