सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मे 2017 (09:04 IST)

पाकच्या उच्चायुक्तांना समन्स

भारताने पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन्स बजावले आहे. दोन भारतीय जवानांचे शिरच्छेद करून विटंबना केल्याप्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांना समन्स बजावला आहे. या प्रकरणी पाकिस्तानने कारवाई करण्याची मागणी भारताने केली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव गोपाळ बागले यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. यावेळी अब्दुल बासित यांच्यासमोर शहीद जवानांचा मुद्दा तसेच त्यांच्या मृतदेहासोबत केलेल्या विटंबनेचा मुद्दाही उपस्थित केला अशी माहिती त्यांनी दिली.