सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (12:22 IST)

आमदार लस्या नंदिता यांचा रस्ता अपघातात मृत्यू

सिकंदराबाद कॅट मधील बीआरएसच्या आमदार लस्या नंदिता यांचा त्यांच्याच गाडीतून प्रवास करत असताना रास्ता अपघातात मृत्यू झाला.वयाच्या 36 व्या वर्षी लस्या नंदिता यांचे निधन झाले. या अपघातात त्यांच्या कारचा चक्काचुर झाला आहे. 
 
हा अपघात संगारेड्डीतील अमीनपूर मंडळ भागात सुलतानपूर आऊटर रिंगरोडवर कार वरील नियंत्रण सुटून कार दुभाजकावर आदळून झाला. या अपघातात लस्या नंदिता गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात कार चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. 
 
बीआरएस  प्रमुख चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केले आहे. 
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्त रेड्डी यांनी एक्स वर पोस्ट करत आपली श्रद्धांजली दिली आहे. कॅन्टच्या आमदार लस्या नंदिता यांच्या अकाली निधनाने मला खूप धक्का बसला आहे. नंदिताचे वडील दिवंगत सायन्ना यांच्याशी माझे जवळचे नाते होते. गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
 
गेल्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनी तेलंगणा विधानसभा निवडणुकीत बीआरएस कडून उमेदवार होत्या. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला होता. 
 
 
 Edited by - Priya Dixit