गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 7 नोव्हेंबर 2021 (10:02 IST)

जागतिक नेत्यांमध्ये पुन्हा मोदीच लोकप्रिय

जागतिक नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच लोकप्रियता सर्वाधिक असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. अप्रुव्हल रेटिंग एजन्सीच्या एका सर्वेक्षणातून हे स्पष्ट झालं आहे.
 
या सर्वेक्षणाद्वारे तयार करण्यात आलेल्या लोकप्रिय जागितक नेत्यांच्या यादीत मोदींनी अनेक बड्या जागतिक नेत्यांना मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह सर्वच नेत्यांना मागं टाकत मोदींनी हे स्थान मिळवलं आहे.
 
या सर्वेक्षणात मोदींना सर्वाधिक 70 टक्के रेटिंग मिळालं आहे. दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेज ओब्राडोर आहेत. त्यांना 66 टक्के रेटिंग मिळालं आहे. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल पाचव्या तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत.