मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

रात्री 8 वाजता मोदी हे देशाशी संवाद साधणार

कोरोनाव्हायरसचा फैलाव हा वेगाने वाढत आहे. त्यावर अतिशय महत्त्वाची माहिती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. 24 मार्चला रात्री 8 वाजता मोदी हे देशाशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते कोरोनाविषयी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
 
आधीही पंतप्रधानांनी देशाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आणि त्याला देशातील जनतेनं उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मोदी हे जनतेला महत्त्वाच्या सूचना देणार असून काही कठोर निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.