मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

माणुसकीचा एक आदर्श

डेहराडून येथील एका मुस्‍लिम कुटुंबीयाने अनाथ असणारा हिंदू मुलगा दत्तक घेऊन त्याच्या हिंदू धर्माप्रमाणेच लग्‍नादी संस्‍कार केले आहेत. त्यांच्या या वागणुकीतून देशात धर्म, जातीच्या पलिकडील माणुसकीचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. 
 
मोईनुद्दीन कुटुंबीयाने १२ व्या वर्षी राकेश रस्‍तोगी या हिंदू अनाथ मुलाला दत्तक घेतले. पोटच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला. मात्र, कधीही त्याला धर्म बदलण्यासाठी दबाव किंवा विचारणा करण्यात आली नाही. विशेष म्‍हणजे त्याचा नुकताच हिंदू परंपरेनुसार विवाहही केला आहे. 
 
मोईनुद्दीन यांची पत्‍नी कौसर यांनी आपल्या सून सोनू हिला हिंदू परंपरेनुसारच स्‍वीकारले. "मी होळी, दिवाळी आणि इतर सण एकाच घरात साजरे करतो. माझ्यावर माझ्या कुटुंबीयांचे खूप प्रेम आहे. माझ्या विवाहासह सर्वच बाबतीत ते मला सहकार्य करतात. एवढेच नाहीतर मला एखाद्या मुस्‍लिम कुटुंबीयात राहतोय असे कधीही वाटले नाही," असे राकेशने सांगितले.