रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अमृतसर पूर्वमधून नवज्योतसिंग सिद्धूला उमेदवारी

पंजाबमध्ये होत असलेल्या  विधासनभा निवडणुकीसाठी माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी लांबी मतदारसंघातून  उमेदवारी अर्ज दाखल केला.

या दोघांशिवाय आपचे नेते भगवंत मान यांनी जलालाबाद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. लांबी मतदारसंघात काँग्रेसचे नेते कॅ. अमरिंदरसिंग, शिरोमणी अकाली दलाकडून रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल तसेच दिल्लीचे माजी आमदार आणि आप नेते जनरेलसिंग, अशी त्रिकोणी लढत होणार आहे. अमरिंदरसिंग यांनी मंगळवारी त्यांचा पारंपरिक मतदारसंघ पटियाला येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.