बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 8 जानेवारी 2018 (09:25 IST)

'त्या' नोटांच्या बनल्या फाईली

नोटबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या  नोटांचाही उपयोग केला जात असून त्याच्यापासून चेन्‍नईतील पुझाल तुरुंगातील कैदी फाईलसह इतर साहित्य तयार करत आहेत. 

यासाठी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या 25 ते 30 कैद्यांच्या एका टीमला खास प्रशिक्षण देण्यात आले असून हातानेच या फायली तयार केल्या जातात. यासाठी रिझर्व्ह बँकेने खराब झालेल्या, बंद करण्यात आलेल्या 70 टन नोटा तुरुंग प्रशासनाला देण्याची तयारी केली असून आतापर्यंत नऊ टन नोटा प्रत्यक्षात तुरुंगाला मिळाल्या आहेत, अशी माहिती तामिळनाडू तुरुंग प्रशासनाचे महासंचालक ए. मुर्गेशन यांनी दिली.

आतापर्यंत 1.5 टन नोटांपासून फायली तयार करण्यात आल्या असून रोज एक हजार फायली तयार केल्या जातात. यासाठी कैद्यांना 160 ते 200 रुपये भत्तादेखील दिला जातो. सध्या हाताने फायली तयार करण्याचे मशिन असले तरी सेफी अ‍ॅटोमेटिक मशिनचाही प्रस्ताव असल्याचे मुर्गेशन यांनी सांगितले.