गुजरात निवडणूक : सी प्लेनने धरोई डॅम पोहोचले पीएम मोदी
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता होणार आहे. तत्पूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव रोड शोला प्रशासनाने परवानगी नाकारल्याने मोदींनी प्रचारासाठी हटके पर्याय अवलंबला, त्यासाठी त्यांनी चक्क साबरमती नदीत उतरून धरोई डॅमपर्यंत सी-प्लेनने प्रवास केला. N181KQ या सी-प्लेनने प्रवास करुन येथील अंबाजी मंदिराला ते भेट देणार आहेत.