गुरूवार, 16 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (18:50 IST)

स्टंट मारणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घडवली अद्दल

Police arrested the youngsters who were performing stunts स्टंट मारणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घडवली अद्दल Marathi  National News  In Webdunia Marathi
सध्या सोशल मीडियावर लोक प्रसिद्धी मिळविण्यासाठी काहीही करतात. अशाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघे तरुण बाईकवर स्टंट करताना दिसत आहे. या मध्ये एक तरुण बाईक चालवत आहे तर दुसरा  त्याच्या खांद्यावर बसून एका हातात पिस्तूल घेऊन दुसऱ्या हाताने सिगारेट ओढत आहे.   
या तरुणांनी वापरलेल्या गाडीच्या नंबरवरून ही गाडी गुजरातची असल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे या व्हिडिओमध्ये तरुणाचा हातात पिस्तूल नवे तर लायटर असल्याचे समोर आले आहे. दहशत पसरवणाऱ्या व्हिडीओ ला 'खलनायक ' असे कॅप्शन दिले आहे. 
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर गुजरात पोलिसांनी या दोघ्या तरुणांवर दहशत पसरवण्याच्या प्रयत्न केल्यामुळे कारवाई केली आहे. अर्थातच या तरुणांना अशी स्टंटबाजी करणे महागातच पडले.