शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 डिसेंबर 2019 (10:48 IST)

'पोक्सो'च्या गुन्हेगारांचा दयेच्या अर्जाचा अधिकार काढून घ्यावा - राष्ट्रपती

महिला आणि बालकांवरील हल्ल्यांमुळं देशाच्या विवेकाला हादरा बसला असून, ज्यांना पोक्सो (Prevention of Children from Sexual Offences Act किंवा POCSO) कायद्याखाली दोषी ठरवण्यात आलंय, त्यांच्या दयेच्या अर्जाचा अधिकार काढून घेतला पाहिजे, असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं.
 
ते राजस्थानमधील माऊंट अबू येथील महिला सुरक्षेवरील कार्यक्रमात बोलत होते.
 
महिलांची सुरक्षा हा गंभीर विषय बनला आहे. यात बरंच काम झालं आणि अजून बरंच काम बाकी आहे. महिलांवर होणारे राक्षसी हल्ले पाहून देशाच्या विवेकाला हादरा बसला आहे. त्यामुळं तुम्ही-आम्ही सर्वजणांनी पुरुषांमध्ये महिलांविषयी आदराची भावना रुजवणे गरजेचे असल्याचं राष्ट्रपती कोविंद म्हणाले. हैदराबाद, उन्नाव इथल्या बलात्काराच्या घटना देशभर चर्चेत असताना राष्ट्रपतींचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
 
दुसरीकडे, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही महिलांवरील अत्याचाराबाबत काळजी व्यक्त केलीय. "महिलांनी पुरुषांकडून सत्ता हिसकावून घ्यावी लागेल, जेणेकरून आपल्याविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांना रोखणं शक्य होईल," असं प्रियंका गांधी म्हणाल्या.