मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020 (08:44 IST)

स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमात मोठे बदल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमात मोठे बदल करण्यात आले आहेत. सोबतच कार्यक्रमाची विशेष तयारी करण्यात आली आहे. यावेळी पाहुण्यांची यादी कमी करण्यात आली आहे. सामाजिक अंतर पाळण्यासाठी लोकांना लांब लांब बसविण्याची योजना आहे. यावेळी स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी ओपन पास दिले जाणार नाहीत.
 
तटबंदीच्या दोन्ही बाजूला फक्त 150 पाहुणे असतील. पूर्वी, दरवर्षी अशा अतिथींची संख्या 300 ते 500 होती. एकूण पाहुण्यांची संख्या 2000 च्या आसपास ठेवली गेली आहे. सोहळ्यामध्ये यंदा बरेच बदल दिसतील. कार्यक्रमाचा कालावधी मात्र कमी करण्यात आलेला नाही.
 
यावेळीही आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सचे जवान पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देतील. त्यांच्यामध्ये सुमारे 22 जवान आणि अधिकारी असतील. त्याच वेळी, राष्ट्रीय सलामीसाठी दिल्ली पोलीस कर्मचार्‍यांसह 32 सैनिक आणि अधिकारी असतील. कोरोना प्रोटोकॉलमुळे, हे जवान चार ओळींमध्ये उभे राहतील आणि सामाजिक अंतराचे नियम पाळतील.