राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेत भाष्य, शिवसेनेवर टीका
नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. मोदी यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा, काश्मीरचे 370 कलम यासह विविध मुद्दयांवर आपले परखड मत व्यक्त केले.
नरेंद्र मोदी यांनी प्रथमच राम मंदिरावरही त्यांची भुमिका स्पष्ट केली. तसेच मित्रपक्ष शिवसेनेसह विरोधकांच्या टीकेलाही उत्तर दिले आहे. नरेंद्र मोदी म्हणाले की अयोध्या येथील राम मंदिराचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. न्यायालय हे सर्व प्रकरण ऐकून घेत आहे. मात्र वाचाळवीर कुठून येतात हे अजून समजले नाही. का ते या प्रकरणामध्ये अडचण निर्माण करू पाहत आहेत ? सर्वोच्च न्यायालय. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर आणि न्यायप्रणालीवर आपला विश्वास असायला हवा. या नाशिकच्या पवित्र जमिनीवरून मी अशा वाचाळवीरांना आवाहन करतो की त्यांनी त्यांचे तोंड बंद ठेवावे. तर रामासाठी, देवासाठी डोळे बंद करून न्यायव्य वस्थवरावश्वास ठेवावा असे मोदी म्हणाले आहेत. काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राम मंदिराची मागणी केली होती.