हरियाणातील अपयशानंतर राहुल गांधींनी मौन तोडले, दिली पहिली प्रतिक्रिया
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. तसेच हा पराभव काँग्रेससाठी विशेषत: राहुल गांधी यांच्यासाठी मोठा धक्का ठरला आहे. हरियाणातील निकालांचे सखोल विश्लेषण करत असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले आणि विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे पाठविण्याचे आश्वासन देखील दिले.
निवडणूक निकालानंतर राहुल गांधी जवळपास 24 तास मौन बाळगून होते. त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही किंवा सोशल मीडियावर काहीही पोस्ट केले नाही. आता त्यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे
हरियाणा निवडणुकीच्या निकालांचे सखोल विश्लेषण करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. तसेच त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील यंत्रसामग्रीच्या गैरवापराचा उल्लेख करून विधानसभा मतदारसंघातून येणाऱ्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे पाठविणार असल्याचे सांगितले.